द. आफ्रिका ‘अ’ संघाची विनंती द्रविडने केली मान्य

By Admin | Updated: August 9, 2015 22:49 IST2015-08-09T22:49:23+5:302015-08-09T22:49:23+5:30

चेन्नईतील दमट वातावरणामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आजारी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पोटाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे भारत ‘अ’ संघ तिरंगी

The Africa 'A' team has been requested by Dravid | द. आफ्रिका ‘अ’ संघाची विनंती द्रविडने केली मान्य

द. आफ्रिका ‘अ’ संघाची विनंती द्रविडने केली मान्य

चेन्नई : चेन्नईतील दमट वातावरणामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आजारी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पोटाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे भारत ‘अ’ संघ तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या स्थानी खेळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या संघव्यवस्थापनाने भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत संपर्क साधला आणि कार्यक्रमामध्ये बदल करण्याची विनंती केली. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचे सहा खेळाडू आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या लढतीत खेळण्यास फिट नाहीत. द्रविड यांनी ही विनंती मान्य केली. आता भारत ‘अ’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारऐवजी सोमवारी लढत खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघातर्फे आज भारत ‘अ’ संघाचा १२ वा खेळाडू मनदीपसिंगला क्षेत्ररक्षण करावे लागले. क्विंटन डिकाकला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवल्यामुळे मनदीप क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. यावरून दक्षिण आफ्रिका संघाच्या परिस्थितीची कल्पना येते. यापूर्वी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा व्हिडिओ विश्लेषक कोएर्टजन डावखुरा वेगवान गोलंदाज एमथोकोजिसी शेजीच्या स्थानी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. कोएर्टजनने क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर एक शानदार झेल टिपण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. त्या वेळी समालोचन करणारे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कोएर्टजनची प्रशंसाही केली. त्याआधी भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीच्या तुलनेत या लढतीत सीमारेषेचे अंतर १० गजाने वाढविण्यात आले. आॅस्ट्रेलियाचा फलंदाज जो बर्न्सने भारत ‘अ’ संघाविरुद्ध १४ षटकार ठोकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. सीमारेषेचे अंतर अधिक असते तर यातील किमान चार किंवा पाच फटक्यांवर झेल टिपण्याची संधी होती. द्रविड यांनी भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सीमारेषेचे अंतर वाढविण्याचे समर्थन केले. (वृत्तसंस्था)

Web Title: The Africa 'A' team has been requested by Dravid