आफ्रिका डाव बातमी
By Admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:28+5:302014-07-12T22:06:28+5:30
लंकन शेर आफ्रिकेपुढे ढेर

आफ्रिका डाव बातमी
ल कन शेर आफ्रिकेपुढे ढेर वन-डे : आफ्रिकेचा श्रीलंकेवर ८२ धावांनी विजय, मालिकेत २-१ ने सरशी, डी़ कॉक, डिव्हिलियर्स यांची शतकेहंबनटोटा : क्विंटन डी कॉक (१२८) आणि ए़ बी़ डिव्हिलियर्स (१०८) यांच्या स्फोटक शतकी खेळाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने तिसर्या आणि अखेरच्या वन-डे लढतीत ८२ धावांनी विजय मिळविला़ या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली़ डी़ कॉक आणि डिव्हिलियर्स यांच्या आकर्षक शतकांच्या बळावर आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर ३४० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले़ त्यानंतर लंकेचा डाव ४४़३ षटकांत २५७ धावांत गुंडाळून सामन्यात ८२ धावांनी विजय मिळविला़ श्रीलंकेकडून एंजेलो मॅथ्यूज (५८) याने शानदार अर्धशतकी खेळी केली़ मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही़ त्यांच्याकडूनकुशल परेरा (३७), तिलकरत्ने दिलशान (३०) आणि कुमार संगकारा याने ३६ धावांचे योगदान दिले़ आफ्रिकेकडून रियान मॅक्लारेन हा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला़ त्याने ३७ धावांत ३ गडी बाद केले, तर मोर्ने मोर्केल आणि जे़ पी़ ड्युमिनी यांनी प्रत्येकी २ गड्यांना माघारी धाडले़ सामनावीर पुरस्कार ए़ बी़ डिव्हिलियर्सने, तर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी हाशिम आमला ठरला़ संक्षिप्त धावफलक : ४४़३ षटकांत सर्वबाद २५७़ (श्रीलंका : कुशल परेरा ३७, तिलकरत्ने दिलशान ३०, कुमार संगकारा ३६, एंजेलो मॅथ्यूज ५८, अशान प्रियरंगजन ३०़ रियान मॅक्लारेन ३/३७, जे़ पी़ ड्युमिनी २/४३, मोर्केल २/४९)़