अफगाणिस्तानचे ‘फायरिंग’
By Admin | Updated: March 17, 2015 23:53 IST2015-03-17T23:53:33+5:302015-03-17T23:53:33+5:30
तालिबान्यांच्या बंदुकीच्या फैरी चुकवत क्रिकेटचे धडे गिरवलेल्या अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडला हरवून आपल्या वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्या-वहिल्या विजयाची नोंद केली.

अफगाणिस्तानचे ‘फायरिंग’
वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद
तालिबान्यांच्या बंदुकीच्या फैरी चुकवत क्रिकेटचे धडे गिरवलेल्या अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडला हरवून आपल्या वर्ल्डकपमधील आपल्या पहिल्या-वहिल्या विजयाची नोंद केली. समिउल्ला शेनवारी याने ९६ धावांची खेळी करीत अफगाणिस्तानला स्कॉटलंडवर एका गड्याने विजय मिळवून दिला. दोन्ही संघांना आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये विजय मिळाला नव्हता. त्यामुळे या सामन्यात इतिहास घडणार आणि एका संघाचे नशीब फळफळणार हे नक्की होते. विजयाचे हे भाग्य यादवीने ग्रासलेल्या आणि तालिबानी अत्याचाराला कंटाळलेल्या अफगाणिस्तानच्या नशिबी होते.