शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजी क्रम बदलल्याचा फायदा

By admin | Updated: October 13, 2014 06:30 IST

संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली

नवी दिल्ली : संघाच्या फायद्यासाठी फलंदाजीला ‘टू डाऊन’ उतरण्यास सहमती दर्शविणाऱ्या विराट कोहलीची भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रशंसा केली. वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यातील ही रणनीती भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. फलंदाजी क्रमातील बदलामुळे संघात ताळमेळ साधला गेला. कोहलीने ६२ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील ३१वे अर्धशतक झळकाविले आणि सूर गवसल्याचे संकेत दिले. कोहलीने सुरेश रैनासोबत (६२) चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २६३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. भारताने दुसऱ्या लढतीत ४८ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजय मिळविल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘कोहली अनुभवी असून, संघाला काय अपेक्षित आहे, याची त्याला कल्पना आहे. नियमित स्थानापेक्षा एका स्थानाने खाली फलंदाजी करण्यासाठी त्याला तयार करण्यात यशस्वी ठरलो. संघाच्या हितासाठी हे आवश्यक असल्याचे त्याच्या लक्षात आहे. आम्हाला सर्वच बाबी तपासाव्या लागतात.’कोहलीच्या स्थानी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. धोनीनेही नाबाद ५१ धावा फटकाविल्या. धोनी पुढे म्हणाला, ‘संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर खेळणे संघासाठी हिताचे आहे. त्यामुळे विराटच्या फलंदाजी क्रमामध्ये बदल करण्यास मदत मिळाली. त्याला सूर गवसला. रायडूला लय गवसण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडला.’ फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. २६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ एकवेळ २ बाद १७० अशा सुस्थितीत होता. त्यानंतर सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने (४-३६) सलामीवीर ड्वेन स्मिथला (९७) तंबूचा मार्ग दाखवित भारतीय संघाला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्यानंतर लेग स्पिनर अमित मिश्रा (२-४०) आणि रवींद्र जडेजा (३-४४) यांनी विंडीजचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनीने सर्वच गोलंदाजांची प्रशंसा केली. धोनी म्हणाला, ‘या खेळपट्टीवर चेंडू असमतोल उसळत होता. आम्ही २० धावा कमी फटकाविल्या, पण गोलंदाजांनी अचूक मारा करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव कायम राखणे महत्त्वाचे होते. शमीने चांगला स्पेल केला. मिश्राने अचूक मारा केला, तर त्यानंतर जडेजाने आपली भूमिका चोख बजावली.’ (वृत्तसंस्था)