सराव जोड
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
रोहितने या लढतीत फिटनेस सिद्ध करताना १२२ चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या सााने १५० धावांची खेळी केली. तिरंगी मालिकेच्या सलामी लढतीत शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे रोहितला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्याच्या फिटनेसबाबत साशंकता होती. पण, रोहितने दीडशतकी खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.

सराव जोड
र हितने या लढतीत फिटनेस सिद्ध करताना १२२ चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या सााने १५० धावांची खेळी केली. तिरंगी मालिकेच्या सलामी लढतीत शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे रोहितला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्याच्या फिटनेसबाबत साशंकता होती. पण, रोहितने दीडशतकी खेळी करीत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्या सलामीवीर शिखर धवनला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तो केवळ ४ धावा काढून बाद झाला. कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणार्या विराटची बॅट वन-डे सामन्यांत त्याच्यावर रुसलेली असल्याचे दिसून आले. पाच धावांवर बाद झाल्यामुळे विराटचे फलंदाजीतील अपयश भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. भारताची चौथ्या षटकांत २ बाद १६ अशी अवस्था असताना रोहित व रैना यांनी तिसर्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. चौथ्या स्थानावर खेळताना रैनाने ७१ चेंडूंमध्ये ५ चौकार व ३ षटकारांच्या सााने ७५ धावांची खेळी केली. रैना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर रोहितने रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. या दोन भागीदारींमुळे भारताला दमदार धावसंख्या उभरता आली. रोहित दीडशतकी खेळी केल्यानंतर बाद झाला. ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी करीत असलेल्या रहाणेने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत (१०) पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची आक्रमक भागीदारी केली. धोनीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यानंतर रहाणेने रवींद्र जडेजाच्या (नाबाद ११) साथीने ४२ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला ३६४ धावांची मजल मारून दिली. रहाणेने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार व २ षटकार लगावताना नाबाद ८८ धावा फटकाविल्या.