कॉलम जोड
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:20+5:302015-02-11T00:33:20+5:30
संघाला अडचणीच्या स्थितीत सामना जिंकण्यासाठी मॅच विनरची गरज असते. त्याचा विचार करता विलियम्सनची परीक्षा ठरणार आहे. त्याचसोबत छोट्या मैदानावर ॲन्डरसनची फलंदाजी व अचूक गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. सोबतीला मॅक्युलम आहेच. गेल्या वर्षी त्याने कसोटी सामन्यांत चमकदार फलंदाजी केली होती. मॅक्युलमसारखा खेळाडू संघात असावा, असे प्रत्येकाला वाटते. तो केवळ एक चांगला फलंदाजच आहे असे नाही तर शानदार कर्णधारही आहे.

कॉलम जोड
स घाला अडचणीच्या स्थितीत सामना जिंकण्यासाठी मॅच विनरची गरज असते. त्याचा विचार करता विलियम्सनची परीक्षा ठरणार आहे. त्याचसोबत छोट्या मैदानावर ॲन्डरसनची फलंदाजी व अचूक गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. सोबतीला मॅक्युलम आहेच. गेल्या वर्षी त्याने कसोटी सामन्यांत चमकदार फलंदाजी केली होती. मॅक्युलमसारखा खेळाडू संघात असावा, असे प्रत्येकाला वाटते. तो केवळ एक चांगला फलंदाजच आहे असे नाही तर शानदार कर्णधारही आहे. न्यूझीलंड संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल आणि या संघाला हा सामना वेलिंग्टनमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्येच उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळण्यास अनेक संघ उत्सुक नसतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विश्वकप स्पर्धेत न्यूझीलंड संघ प्रथमच तुल्यबळ खेळाडूंसह सहभागी होत असल्याचे चित्र आहे. (टीसीएम)