‘नवोदित खेळाडूंसाठी अ‍ॅकडमी’

By Admin | Updated: July 18, 2015 02:38 IST2015-07-18T02:38:50+5:302015-07-18T02:38:50+5:30

आपल्याकडे मेहनती तरुणांची कमी नाही परंतु त्यांना गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. याच कारणामुळे जयपुर पिंक पँथर महाराष्ट्रात युथ अ‍ॅकडमीची स्थापना करणार आहे.

Academy for 'budding players' | ‘नवोदित खेळाडूंसाठी अ‍ॅकडमी’

‘नवोदित खेळाडूंसाठी अ‍ॅकडमी’

मुंबई : आपल्याकडे मेहनती तरुणांची कमी नाही परंतु त्यांना गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. याच कारणामुळे जयपुर पिंक पँथर महाराष्ट्रात युथ अ‍ॅकडमीची स्थापना करणार आहे. ही अ‍ॅकडमीमध्ये सर्व खेळाडूंसाठी खुली असून यंदा जयपूर संघात चार ज्युनियर खेळाडूंना स्थान देण्यात आले, असे जयपुर पिंक पँथरचा मालक अभिषेक बच्चनने स्पष्ट केले.
मुंबईतील झालेल्या एका कार्यक्रमात अभिषेक बच्चनने ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले, यंदा २० वर्षांखालील अरुण, धर्मेद्र, सुरज, रोहित अशा चार खेळाडूंची संघात वर्णाी लागली आहे. भविष्याच्या दृष्टीने हे महत्तवाचे आहे. महाराष्ट्रातील दोन खेळांडूसह इरान, कोरिया, नेपाल, जपान येथील प्रत्येकी एका खेळाडूचा संघात समावेश आहे. जयपूर संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरुन विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने खेळेल.
जयपुर संघांव्यतिरिक्त यू मुंबा संघाला प्रथम पसंती देताना अभिषेकने तयारीविषयी सांगितले की, प्रथम आमचा संघ १४ सामने खेळून सेमी अंतिम फेरीत कसा पोहचेल याकडे लक्ष राहिल. जयपूरचा अव्वल बचावपटू महाराष्ट्राचा प्रशांत चव्हाण तीन महिन्यापुर्वी दुखापतग्रस्त झाला. याबाबत अभिषेकने सांगितले की, प्रशांत संघासोबत असणे महत्तवाचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Academy for 'budding players'