शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 7:57 AM

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली.

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली. खेळातील कारभारात झालेल्या सुधारणेचे परिणामदेखील पुढे येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय खेळाडू इतके प्रतिस्पर्धी कधीच नव्हते. सध्या मात्र सर्वोत्तम मानांकनात आहेत. ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्याकडे संधी आहे. कोरोना काळात त्यांनी शिस्तबद्ध तयारी केली. मागच्या २० वर्षांच्या तुलनेत जे स्रोत अलीकडे उपलब्ध झाले त्यातून सर्वात चांगले खेळाडू घडू शकले. नेमबाजी संघानेदेखील उपलब्ध झालेली आर्थिक मदत आणि इतर सुविधांचा पुरेपूर वापर केला.

असे म्हटले जाते की, ऑलिम्पिक चळचळ ही स्पर्धेपेक्षा मोठी असते. येथे उत्कृष्टता, मैत्री आणि आदर ही मूल्ये खेळाडूंना विशेष बनवितात. केवळ पदक जिंकण्यासाठी खेळतो असे नाही तर आम्ही आमच्या देशाचे आणि ऑलिम्पिकचे राजदूत म्हणून येथे वावरतो. खेळाइतके सामर्थ्य दुसऱ्या कशातच नाही.खेळात कसे जिंकता येईल हे तर शिकतोच, पण समोरच्याला कसे पराभूत करता येईल, हे देखील शिकतो. नियमांचे प्रामाणिकपणा आणि सचोटीचे पालन करणे शिकतो. एक ध्येय ठेवणे आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे शिकतो. इतरांचे ऐकणे आणि त्यांना सन्मान देणे शिकतो. आमचा समाज इतरांचे ऐकत नसेल तर खेळाच्या माध्यमातून आपण इतरांचा आदर करू या. त्यांच्याशी मैत्री वृद्धिंगत करू या...

थोडे मागे जाऊ या. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये माघारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या टार्स्क फोर्सने भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली. याचे श्रेय खेळाडूंना द्यावे लागेल. गेल्या चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. या काळात आम्ही आमच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत राहिलो. आधी काय होतो, यापेक्षा पुढचा दिवस कसा चांगला राहील, याचा नेहमी विचार केलेला बरा. गेल्या काही वर्षांत सकारात्मक गोष्टी घडल्या. सहकार्याची भावना आपल्याला अधिक झेप घेण्यास बळकट करेल, अशी आशा करू या.

- ऑलिम्पिकची मूल्ये खेळाडूला आयुष्याचा मार्ग शिकवितात. म्हणूनच खेळाडूंचे वर्तन समाजासाठी प्रासंगिक ठरावे. पदके जिंकणे विलक्षण असते, पण खेळाची खरी शक्ती क्रीडा स्पर्धेच्या निकालाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव पाडत असते.

- याबाबत अद्‌भूत असे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. इटालियन नेमबाज आणि तिहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन निकोलो कॅंप्रियानी यांच्यासोबत सुरू असलेला माझा शरणार्थी प्रकल्प. हे कार्य माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे. यातील काही जण टोकियो स्पर्धा करतील. त्यांचे आयुष्य बदलले. विचलित, दु:खी मानव ते क्रीडापटू! त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ध्येय. आपण म्हणू शकतो की, खेळाने त्यांच्या आयुष्याला कलाटणीे दिली.

(अभिनव बिंद्रा हे चॅम्पियन नेमबाज असून, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचे १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्ण विजेते आहेत.) 

टॅग्स :Shootingगोळीबार