अभिनव बिंद्राकडून सुवर्णपदकासाठी आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:03 IST2018-08-12T06:02:55+5:302018-08-12T06:03:07+5:30
अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

अभिनव बिंद्राकडून सुवर्णपदकासाठी आवाहन
नवी दिल्ली - अगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आॅलिंपिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. भारताकडून आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.
सुवर्णपदक पटकावलेल्या घटनेला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रसिद्ध करण्यातत आलेल्या या व्हिडिओमध्ये बिंद्रा याच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. बिंद्राने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तो म्हणाला, ‘तू मला मी जो आहे तो घडवलस. आता तू अन्य भारतीय खेळाडूंनाही प्रेरणा द्यायला हवी. आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी सुवर्णपदक मिळवावे यासाठी मी शुभेच्छा देत आहे.’
हॅपी बर्थडे गोल्ड..दहा वर्ष पूर्ण झाली. आता टोकियो २०२० साठी दोन वर्ष उरली आहेत.’
तो म्हणाला, मेहनत, समर्पण, बलीदान व सयंम या गोष्टींमुळेच विजयाला गवसणी घालता येते.आपल्या देशात गुणवत्तेला कमतरता नाही. माझा हा व्हिडिओ आशियाई व आॅलिंपिक स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यासाठी प्रेरणादाई ठरेल अशी मला आशा आहे.’