अभिजित गुप्ताने जिंकली हुगेवीन इंटरनॅशनल स्पर्धा

By Admin | Updated: October 25, 2015 23:55 IST2015-10-25T23:55:17+5:302015-10-25T23:55:17+5:30

भारतीय ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता याने आपल्या अव्वल मानांकित क्रमवारीच्या प्रतिष्ठेनुसार येथे नवव्या आणि अखेरच्या फेरीत आपल्याच देशाच्या नीलोत्पल दास याला

Abhijit Gupta won the Hugewien International Tournament | अभिजित गुप्ताने जिंकली हुगेवीन इंटरनॅशनल स्पर्धा

अभिजित गुप्ताने जिंकली हुगेवीन इंटरनॅशनल स्पर्धा

हुगेवीन (नेदरलँड) : भारतीय ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता याने आपल्या अव्वल मानांकित क्रमवारीच्या प्रतिष्ठेनुसार येथे नवव्या आणि अखेरच्या फेरीत आपल्याच देशाच्या नीलोत्पल दास याला
पराभूत करीत हुगेवीन इंटरनॅशनल ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
गुप्ताने अखेरच्या फेरीतील एकतर्फी लढतीत फक्त २0 चालींत विजय मिळवला.
गुप्ताने ९ पैकी ७ गुण मिळवले. त्याने भारताच्या दीप सेनगुप्ता याच्याशिवाय नेदरलँडच्या बेंजामीन बोक आणि यान वेर्ले यांना अर्ध्या गुणाने पिछाडीवर टाकले. या तिघांनी ६.५ गुण मिळवले.
गुप्ताचा मार्ग एवढा सोपा नव्हता. त्याला दुसऱ्या फेरीत आपल्याच देशाच्या अंकित राजपारा याच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला; परंतु त्यानंतर त्याने सलग तीन विजयासह जोरदार मुसंडी मारली आणि पुन्हा अखेरच्या फेरीत दास याला नमवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Abhijit Gupta won the Hugewien International Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.