ूराज्य जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी अभय दाढे
By Admin | Updated: May 28, 2015 23:58 IST2015-05-28T23:58:47+5:302015-05-28T23:58:47+5:30
अध्यक्षपदी अभय दाढे ,तर सचिवपदी झुबिन अमेरिया

ूराज्य जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी अभय दाढे
अ ्यक्षपदी अभय दाढे ,तर सचिवपदी झुबिन अमेरिया राज्य जलतरण संघटना : खजिनदारपदी पुण्याच्या नीता तळवलीकर पुणे : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी पुण्याचे अभय दाढे, तर सचिवपदी सोलापूरचे झुबिन अमेरिया यांची प्रथमच निवड झाली आहे. अस्थायी समितीचे कार्याध्यक्ष अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत २०१५ ते २०१९ अशा चार वर्षांकरिता नव्याने पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. दोन वेळा अध्यक्ष असलेले कोल्हापूरचे राजेंद्र जाधव यांच्या जागी पुण्याचे अभय दाढे, तर ठाण्याच्या किशोर वैद्य यांच्या जागी झुबिन अमेरिया यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी पुण्याच्या नीता तळवलीकर यांची निवड झाली असून, राज्य संघटनेत त्यांच्या रुपाने महिलांना प्रथमच स्थान मिळाले आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जलतरण महासंघाचे सहसचिव मेकाला रामकृष्णन आणि महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे सदस्य मनोज भोरे हे निरीक्षक म्हणून होते आणि निवडणूक अधिकारी म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश डी. जी. देशपांडे यांनी काम पाहिले. नवीन पदाधिकारी असे - अध्यक्ष-अभय दाढे (पुणे); उपाध्यक्ष- जयप्रकाश दुबळे (नागपूर), बन्सी जयसिंग (मुंबई शहर), सुरेश कदम (नांदेड), प्रभाकर धरत (रायगड); सचिव - झुबिन अमेरिया (सोलापूर); सहसचिव - मयूर व्यास (मुंबई), फारुख शेख ( जळगाव), संभाजी भोसले (नागपूर); खजिनदार- नीता तळवलीकर (पुणे); कार्यकारिणी सदस्य - सदानंद जोशी (रत्नागिरी), शंकरभाऊ कोळी (रायगड), रत्नाकर क्षीरसागर (बीड), शिरिष कोल्हापुरे (सोलापूर), मधुकर वैद्य (औरंगाबाद), शत्रुघ्न बिरकड (अकोला), प्रकाश कदम (कोल्हापूर) (क्रीडा प्रतिनिधी)===========================================.