एबीने निवृत्तीचा युक्तिवाद फेटाळला
By Admin | Updated: December 29, 2015 01:26 IST2015-12-29T01:26:02+5:302015-12-29T01:26:02+5:30
वनडेतील नंबर वन फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या अॅबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सातत्याने जबाबदारी पार पडल्यानंतर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याच्या हेतूने आपल्या खांद्यावरील

एबीने निवृत्तीचा युक्तिवाद फेटाळला
डरबन : वनडेतील नंबर वन फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सातत्याने जबाबदारी पार पडल्यानंतर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याच्या हेतूने आपल्या खांद्यावरील भार कमी करू इच्छितो असे सांगितले, तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा होत असलेला युक्तिवादही फेटाळला आहे.
जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज समजला जाणाऱ्या डिव्हिलियर्सने म्हटले, ‘माझ्या निवृत्तीविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याविषयीच बोलत आहे. खेळाचा आनंद लुटणे ही बाब माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. क्रिकेटमधील आपल्या काही जबाबदाऱ्या मी कमी करू इच्छितो.’ एबी डिव्हियलिर्स पुढे म्हणाला, ‘जर मी आयपीएलच्या सर्वच लढतीत खेळलो, तर हंगामाअखेरपर्यंत थकून जातो. हीच बाब मी गेल्या
काही कालावधीपासून सांगत
आहे.’ (वृत्तसंस्था)
माझ्यासाठी खेळाचा आनंद लुटणे आणि स्वत:ला ताजेतवाने ठेवणे याला जास्त प्राथमिकता आहे. मला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आवडते आणि यात
काहीही बदल झालेला नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत एक अतिरिक्त
फलंदाज खेळवण्यासाठी डिव्हिलियर्स यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढली आहे. त्या आधी फलंदाजीवर
लक्ष केंद्रित करण्यासाठी डिव्हिलियर्सने यष्टिरक्षकाची भूमिका सोडली होती.