शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामन्यादरम्यान अश्लील कृत्य करणं जोडप्याला पडलं महागात; ६ सेकंदाची मस्ती अन् ६ महिने तुरूंगवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 15:20 IST

सामन्यादरम्यान अश्लील कृत्य करणं जोडप्याला महागात पडले आहे.

नवी दिल्ली : प्रेम आंधळे असते प्रेमात व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतो असे नेहमी बोलले जाते. सध्या याचाच एक प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. बेसबॉलचा  सामना (Baseball Match) पाहण्यासाठी आलेले जोडपे (Couple) दिवसाढवळ्या स्टेडियमवर अश्लील चाळे करत होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित जोडप्यावर कारवाई केली आहे. आता या जोडप्याला ६ सेकंदाच्या व्हायरल व्हिडीओसाठी (Viral Video) ६ महिन्यांचा तुरूंगवास (Jail) होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ऑकलंडमधील रिंग सेंट्रल कोलिझियम स्टेडियमवर ऑकलंड थलेटिक्स आणि सीटल मरिन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी एका जोडप्यानेही हजेरी लावली होती, त्यांनी स्टेडियम निम्मे रिकामे पाहून संधीचा फायदा घेतला. शेवटच्या सीटवर बसून या जोडप्याने अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. या जोडप्याच्या अश्लील कृत्याचा ६ सेकंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांना मिळाली माहिती 

यानंतर स्थानिक पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबद्दल TMZ ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ऑकलंड पोलिसांना याबाबत काहीही माहिती नव्हती. सामना संपल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, जर हे जोडपे दोषी आढळले, ज्याची दाट शक्यता देखील आहे. असे झाल्यास ६ महिने तुरूंगवास किंवा ८०,००० रूपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. या सामन्यात थलेटिक्सने मरीन्सचा ५-३ ने पराभव केला. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBaseballबेसबॉलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस