शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

DSP, १५ लाख अन् १ कोटी! कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघावर बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 19:33 IST

team india hockey : भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली. 

Paris Olympics 2024 : भारताच्याहॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकले. भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकताच हॉकीच्या महासंघाने प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. याशिवाय सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ७.५ लाख रूपये मिळतील. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक ठरले.

टीम इंडियातील खेळाडूंना बक्षीस जाहीर करताना महासंघाने सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ७.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. याची माहिती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. याशिवाय पंजाब सरकार आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही बक्षिसे जाहीर केली आहेत.

खेळाडूंवर पैशांचा वर्षाव मूळचा मध्य प्रदेशातील असलेल्या विवेक सागरचा उल्लेख मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलीस उपअधीक्षक (DSP) असा केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी विवेक सागरशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विवेक सागर याचे अभिनंदन करताना सांगितले की, तू मध्य प्रदेशला गौरव मिळवून दिला आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे. विवेक सागर आमचा डीएसपी आहे, असे मोहन यादव यांनी आवर्जुन सांगितले. तसेच सरकारकडून त्याला कोट्यवधी रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर पंजाब सरकारने देखील खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, कांस्य पदक विजेत्या हॉकी संघातील सर्व खेळाडूंना पंजाब सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल.  

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndiaभारतBhagwant Mannभगवंत मान