FIFA World Cup 2022: धोनीचा सातासमुद्रापार डंका! फिफा विश्वचषकातही दिसला माहिचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:45 IST2022-11-25T12:44:16+5:302022-11-25T12:45:10+5:30
सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

FIFA World Cup 2022: धोनीचा सातासमुद्रापार डंका! फिफा विश्वचषकातही दिसला माहिचा जलवा
कतार: सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत भारताला स्थान मिळाले नाही, भारतीय फुटबॉल संघ पुन्हा एकदा या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला. अशातच ब्राझील आणि सर्बिया यांच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीची झलक पाहायला मिळाली. काल झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या एका चाहत्याने लुसेल स्टेडियमवर ब्राझील आणि सर्बिया यांच्यातील सामन्यात माहिची जर्सी झळकवली.
ब्राझीलची विजयी सलामी
या सामन्यात विजय मिळवून पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पण, त्यांचा स्टार खेळाडू नेयमार याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे ब्राझीलच्या चिंतेत भर पडली आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात रिचार्लिसन ( Richarlison) याने दोन गोल (62 मि. व 73मि.) करताना ब्राझीलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अखेर ब्राझीलने 2-0 ने विजय मिळवून आपल्या अभियानाची सुरूवात केली. ब्राझीलच्या रिचर्लिसनच्या दुहेरी गोलच्या जोरावर त्यांनी सर्बियाचा पराभव केला.
#Yellove at #FIFAWorldCup@ChennaiIPL via @nabeel_vp@DhoniFansKerala
— WhistlePodu Army ® - CSK Fan Club (@CSKFansOfficial) November 24, 2022
💛 #EverywhereweGo#Brasil#Dhoni#CSK#Brapic.twitter.com/WGAcTqGflI
धोनीचा सातासमुद्रापार डंका
खरं तर या सामन्यातील महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. चेन्नई सुपर किंग्जने लुसेल स्टेडियममधील धोनीच्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये धोनीचा चाहता ब्राझीलच्या चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे. धोनीच्या चाहत्याने यापूर्वी एमएस धोनीला भेटून सेल्फी देखील काढला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"