लुईस सुआरेझवर 9 सामन्यांची बंदी
By Admin | Updated: June 27, 2014 01:40 IST2014-06-27T01:40:36+5:302014-06-27T01:40:36+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या फिफेंडर जॉजिर्ओ चिलीनीचा चावा घेणो उरुग्वेचा स्ट्राईकर सुआरेझ लुईस याला चांगलेच भोवले आह़े

लुईस सुआरेझवर 9 सामन्यांची बंदी
>जॉजिर्ओला चावणो भोवले : चार महिने खेळू शकणार नाही
रिओ दि जेनेरिओ : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या फिफेंडर जॉजिर्ओ चिलीनीचा चावा घेणो उरुग्वेचा स्ट्राईकर सुआरेझ लुईस याला चांगलेच भोवले आह़े या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा)सुआरेझवर 9 सामन्यांची बंदी घातली आह़े या बंदीमुळे 4 महिने तो फुटबॉल खेळू शकणार नाही़
फिफाने घातलेल्या बंदीमुळे सुआरेझ विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्याला मुकणार आह़े त्याचबरोबर कोपा अमेरिका चषक आणि इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्येही तो खेळू शकणार नाही़ विशेष म्हणजे फिफाने या सुआरेझवर 1क्क्,क्क्क् स्वीस फ्रँक आणि 112,क्क्क् डॉलरचा दंड सुद्धा ठोठावला आह़े
मंगवारी झालेल्या सामन्यांत इटलीचा फिफेंडर जॉजिर्ओ चिलीनी याच्या खांद्याला सुआरेझने चावा घेतला होता़ या लढतीत उरुग्वेने 1-क् अशी बाजी मारली होती़ तेव्हा ही घटना बघितली नसल्यामुळे रेफरींनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती;मात्र आता या खेळाडूला 4 महिने फुटबॉलपासून दूर राहावे लागणार आह़े
फिफा अनुशासन समितीचे अध्यक्ष क्लाडिओ सुलसेर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, अनुभवी सुआरेझकडून अशा कृत्याची अपेक्षा नव्हती़ फुटबॉल मैदानावर अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही़ विशेष म्हणजे वर्ल्डकपमध्ये अशी घटना व्हायला नको होती़ (वृत्तसंस्था)