शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

खूब लड़ी मर्दानी ! भारतीय महिला हॉकी संघाची कडवी टक्कर, पण हुकली ऑलिम्पिकची वारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 6:21 PM

2024 Women's FIH Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला संघाचे पॅरिस ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले.

2024 Women's FIH Hockey Olympic Qualifiers: भारतीय महिला संघाचे पॅरिस ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले. रांची येथे झालेल्या २०२४ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची संधी गमावली. जपानविरुद्धच्या आजच्या लढतीत भारतीला १-० अशी हार मानावी लागली. भारतीय महिलांनी अखेरच्या मिनिटापर्यंत गोल करण्याचा जीव तोडून प्रयत्न केला, परंतु नशीबाने त्यांची साथ नाही दिली. 

पात्रता स्पर्धेतील अव्वल तीन संघ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार होते आणि घरच्या मैदानावरील या स्पर्धेत भारतीय संघाला आपले नाणे खणखणीत वाजवण्याची संधी होती. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जर्मनीविरुद्ध यजमान संघाने कडवी टक्कर दिली, परंतु सडन डेथमध्ये हार झाली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या आजच्या लढतीत जपानचे आव्हान मोडण्याचा निर्धार भारतीय महिला खेळाडूंनी केला होता. पण, सहाव्या मिनिटाला जपानच्या उराता काना हिने गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने अभेद्य बचाव उभा करून सामना शेवटच्या क्वार्टरपर्यंत नेला.

भारतीय खेळाडूंकडून जोरदार प्रयत्न होताना दिसले, परंतु जपानचा बचाव वरचढ ठरला. चौथ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला भारतीय महिलांनी बरोबरीचा गोल जवळपास केलाच होता, परंतु जपानच्या गोलरक्षकाने तितकाच सुरेख बचाव केला. पण, भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि तो यजमानांनी गमावला. भारतीय संघाचे पेनल्टी क्षेत्रातील आक्रमण प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणार होता. ७व्या मिनिटाला जपानची गोलरक्षक अकियो तनाकाने अविश्वसनीय बचाव केला. भारताने निर्माण केलेली ही सामन्यातील ही सर्वात अप्रतिम संधी होती. भारतीय संघाला सलग ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि तनाका तितक्याच ताकदीने उभी होती. भारतीय संघाला शेवटी हार मानावी लागली. 

उपांत्य फेरीत जर्मनीला झुंजवलेभारतीय महिला हॉकी संघाने २०२४ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत गुरुवारी जर्मनीला टफ फाईट दिली होती. उपांत्य फेरीची ही लढत जिंकून भारताला २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित करता आला असता. पण, कडवी टक्कर देऊनही भारतीय संघाला हार मानावी लागली. दीपिकाने १५व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिल्यानंतर स्टॅपेनहोर्स्टच्या ( २७ व ५७ मि.) गोलच्या जोरावर जर्मनीने पुनरागमन केले, परंतु इशिकाने ५९व्या मिनिटाला गोल करून सामना २-२ असा बरोबरीत रोखला. पेनल्टी शूटआऊटमध्येही ३-३ अशी बरोबरी झाल्याने सडन डेथवर निकाल लावला. जर्मनीच्या नॉल्टेने गोल केला, परंतु सोनिकाला अपयश आले अन् भारताला २-२ ( ४-३) अशी हार मानावी लागली. 

भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास.... १९८० मध्ये भारतीय महिला संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळळा होता आणि तेव्हा ते चौथ्या स्थानावर समाधानी राहिले होते. त्यानंतर ऑलिम्पिक खेळण्यासाठी २०१६ साल उजाडले. ब्राझिलमध्ये झालेल्या स्पर्धेत महिला संघ १२ व्या क्रमांकावर राहिला होता. २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते, परंतु त्यांच्या खेळाची सर्वांनी प्रशंसा केली होती. 

टॅग्स :HockeyहॉकीOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021ParisपॅरिसJapanजपान