शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: आशियाई स्पर्धा अन् भारत... जाणून घ्या सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 09:51 IST

Asian Games 2018: "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे.

मुंबई -  "Energy of Asia" या ब्रीदवाक्याने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. जवळपास 45 देशांतील हजारो खेळाडू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी वर्षानुवर्षे आशियाई स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मात्र, त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या निर्धाराने भारतीय खेळाडू जकार्ता येथे दाखल झाले आहेत. 

अनुभव खेळाडू आणि युवा जोश यांची योग्य सांगड यंदाच्या भारतीय चमूत दिसत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भारताने 1951च्या नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत सर्वाधिक 15 सुवर्णपदक जिंकले होते आणि सुवर्णपदकाचा हा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धा आणि भारत याबाबत चला जाणून घेऊया..भारताने आत्तापर्यंत सर्वात मोठं पथक पाठवले आहे. 572 खेळाडू ( 312 पुरूष व 260 महिला) ध्वजधारक - नीरज चोप्रा ( भालाफेकपटू) 45 पैकी 36 क्रीडा प्रकारात भारत सहभाग घेणार आहे.

भारताची कामगिरीएकूण 617 पदकं - 139 सुवर्ण, 177 रौप्य आणि 298 कांस्य2010च्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक 65 पदकं जिंकली आहेत. ( 14 सुवर्ण, 17 रौप्य व 34 कांस्य)1951 च्या नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत भारताने 51 आणि 1982 व 2014 मध्ये प्रत्येकी 57 पदकं जिंकली आहेत.पदकतालिकेत भारतीय संघ केवळ दोनदाच अव्वल आठ संघांमध्ये स्थान पटकावू शकला नाही. 1990 मध्ये भारत 11व्या, तर 1998 मध्ये भारत 9व्या स्थानावर होता. भारताच्या एकूण 139 सुवर्णपदकांमध्ये अॅथलेटिक्सचा ( 72) मोठा वाटा आहे. त्यापाठोपाठ कुस्ती व कबड्डी ( प्रत्येकी 9) यांचा क्रमांक येतो.  

तारीख - 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर वेळ - सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतथेट प्रक्षेपण - सोनी टेन 1, सोनी टेन 2, सोनी टेन 3 

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८IndiaभारतSania Mirzaसानिया मिर्झा