२००३ - ऑस्ट्रेलियाच अव्वल

By Admin | Updated: February 15, 2015 16:07 IST2015-02-15T16:07:50+5:302015-02-15T16:07:50+5:30

आठव्या पर्वात विश्वचषकातील संघांची संख्या १२ वरुन १४ वर नेण्यात आली.

2003 - Australia tops | २००३ - ऑस्ट्रेलियाच अव्वल

२००३ - ऑस्ट्रेलियाच अव्वल

>आयसीसी वर्ल्डकपचे आठवे पर्व ९ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या देशांमध्ये पार पडले. आठव्या पर्वात विश्वचषकातील संघांची संख्या १२ वरुन १४ वर नेण्यात आली. कसोटी खेळणा-या कॅनडा, हॉलंड आणि नामिबीया या देशांना वर्ल्डकपमध्ये स्थान देण्यात आले. मात्र नवीन देशांना संधी देण्याच्या प्रयत्नात या विश्वचषकात अनेक एकतर्फी लढती पाहायला मिळाल्या. 
 
आठव्या पर्वात इंग्लंडने झिम्बाब्वेमध्ये खेळण्यास नकार दिला. तर यजमान दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा विश्वचषकात अपयशी ठरले. केनियाने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने पंचांनी नाबादचा चुकीचा निर्णय देऊनही स्वतःहून मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. भारतीय संघ १९८३ ची पुनरावृत्ती करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिगच्या धडाकेबाज १४० धावांच्या खेळीन ऑस्ट्रेलियाने अवघे २ गडी गमावत ५० षटकांत ३५९ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोसळली. 
भारताने सर्वगडी गमावत २३९ धावाच केल्या. विरेंदर सेहवागचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर तग धरु शकला नाही. 
 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ५४ 
एकूण धावा - २०, ४४१
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - सचिन तेंडुलकर - भारत - (११ सामन्यात ६७३ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - चामिंडा वास - श्रीलंका (१० सामन्यात २३ विकेट्स)

Web Title: 2003 - Australia tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.