२ भारतीय अधिका-यांना अटक
By Admin | Updated: August 4, 2014 03:56 IST2014-08-04T03:56:09+5:302014-08-04T03:56:09+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोपाच्या आधी भारतीय क्रीडा जगताला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

२ भारतीय अधिका-यांना अटक
ग्लास्गो : राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोपाच्या आधी भारतीय क्रीडा जगताला काळिमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) महासचिव राजीव मेहता यांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी आणि कुस्तीचे रेफरी वीरेंद्र सिंह मलिक यांना हॉटेलमधील कथित विनयभंग प्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
या अधिकाऱ्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. मात्र, हे दोघे अधिकारी भारताच्या अधिकृत २१५ सदस्यांच्या पथकातील नाहीत. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या प्रवक्त्याने या अधिकाऱ्यांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. याबाबत भारतीय उच्चायुक्त म्हणाले, या प्रकरणावर दूतावास नजर ठेवून आहे.