१९९९ - ऑस्ट्रेलियाच किंग

By Admin | Updated: February 15, 2015 16:03 IST2015-02-15T16:03:09+5:302015-02-15T16:03:09+5:30

विश्वचषकाचे सातवे पर्व पुन्हा इंग्लंडमध्ये पार पडले. १४ मे ते २० जून या कालावधीत रंगलेल्या या पर्वात एकूण १२ संघ सहभागी झाले होते.

1999 - King of Australia | १९९९ - ऑस्ट्रेलियाच किंग

१९९९ - ऑस्ट्रेलियाच किंग

>विश्वचषकाचे सातवे पर्व पुन्हा इंग्लंडमध्ये पार पडले. १४ मे ते २० जून या कालावधीत रंगलेल्या या पर्वात एकूण १२ संघ सहभागी झाले होते. यात स्कॉटलँड, बांग्लादेश या नवीन देशांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. 
सुपर सिक्स ही नवीन संकल्पना या विश्वचषकात राबवण्यात आली. यामध्ये दोन्ही गटातील टॉपच्या तीन संघाचा निवड करण्यात आली. सुपर सिक्समधील टॉपच्या चार संघांना सेमी फायनलमध्ये प्रवेश करता येणार होता. अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान असा पार पडला. शेन वॉर्नच्या फिरकीने घेतलेल्या चार विकेट व अॅडम गिलख्रिस्टचे अर्धशतक या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकचा आठ गडी राखून धूव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणा-या पाकचा डाव अवघ्या १३३ धावांवर आटोपला. पाकचे १३४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठून दुस-यांदा विश्वचषकावर नाव कोरले. 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ४२
एकूण धावा - १६, ७१९
एकूण विकेट्स - ५७९
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - राहुल द्रविड - भारत ( आठ सामन्यांमध्ये ४६१ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज -  गॉफ अॅलोट - न्यूझीलंड - (९ सामन्यांमध्ये २० विकेट) 

Web Title: 1999 - King of Australia