भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८९ धावांचे आव्हान
By Admin | Updated: January 26, 2016 15:45 IST2016-01-26T15:45:51+5:302016-01-26T15:45:51+5:30
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करणा-या भारताने चांगली फटकेबाजी करत २० षटकांमध्ये ३ गडी गमावत १८८ धावा केल्या आहेत

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १८९ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २६ - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करणा-या भारताने चांगली फटकेबाजी करत २० षटकांमध्ये ३ गडी गमावत १८८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १८९ धावांची गरज असून आता भारताची सगळी मदार गोलंदाजांवर आहे.
या सामन्यात युवराज सिंगचे पुनरागमन झाले असले तरी वरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे युवराजला फलंदाजीची संधी मिळाली नाही. विराट कोहलीने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये ९० धावा फटकावल्या. तर रोहित शर्माने २० चेंडूंमध्ये ३१ धावा व सुरेश रैनाने ३४ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या.
शेवटच्या षटकात दुस-या चेंडूवर रैना बाद झाल्यावक आलेल्या महेंद्रसिंह धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार व दुस-या चेंडूवर चौकार लगावला. धोनीने ३ चेंडूंमध्ये ११ धावांची उपयुक्त खेळी केली.