१८ ग्रॅण्डस्लॅम क्लबची मेंबर
By Admin | Updated: September 10, 2014 02:47 IST2014-09-10T02:47:50+5:302014-09-10T02:47:50+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी महिला एकेरीच्या अंतिम लढतीत कॅरोलिन व्होज्नियाकीचा पराभव करीत कारकीर्दीतील १८ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद .

१८ ग्रॅण्डस्लॅम क्लबची मेंबर
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी महिला एकेरीच्या अंतिम लढतीत कॅरोलिन व्होज्नियाकीचा पराभव करीत कारकीर्दीतील १८ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत सेरेनाने सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळविला. वर्षातील पहिल्या तीन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर सेरेनाने रविवारी व्होज्नियाकीचा ६-३, ६-३ ने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. सेरेनाची १८ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा जवळजवळ वर्षभरानंतर रविवारी संपली. या विजेतेपदासह सेरेनाने ख्रिस एव्हर्ट व मार्टिना नव्हरातिलोव्हा यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. आता सेरेनापेक्षा अधिक ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकाविणाऱ्या खेळाडूंमध्ये स्टेफी ग्राफ (२२) आणि मारग्रेस कोर्ट (२४) यांचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरीस वयाची ३३ वर्षे पूर्ण करणाऱ्या सेरेनाने १८ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदानंतर आनंद झाल्याचे सांगितले. एव्हर्ट व नव्हरातिलोव्हा यांनी सेरेनाला सोन्याचे कंगन भेट दिले. त्यावर ‘१८’ असा आकडा होता.