शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 14:54 IST

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार पार पडला.

नवी दिल्ली : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) चा थरार पार पडला. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७२ देशातील ५ हजारहून अधिक थलीट सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी भारताच्या शेजारील देश श्रीलंका देशातील देखील खेळाडू आले होते, मात्र राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर १० श्रीलंकन खेळाडू बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ थलीट आणि एका मॅनेजरचा समावेश आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे म्हणूनच हे १० जण आपल्या देशात परतण्यास तयार नाहीत असेही बोलले जात आहे. 

दरम्यान, बेपत्ता झालेल्या खेळाडूंना शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. श्रीलंका मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील स्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोकांना इंधनासाठी ५-६ दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेचे नागरिक देश सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ५१ अधिकाऱ्यांसह १६१ सदस्यांचा गट श्रीलंकेतून बर्गिंहॅमला गेला होता. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंवरही संकट आले असले, तरी राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि तेथील क्रिकेट मंडळाच्या मदतीने त्यांना बर्मिंगहॅमला जाता आले होते.

आर्थिक संकटामुळे यूएईत आशिया चषकाचे आयोजनश्रीलंकेत सध्याच्या घडीला सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. देशातील नागरिकांना गरजू वस्तूंसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ चे आयोजन श्रीलंकेत न होता यूएईच्या धरतीवर होणार आहे. आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेने यूएईला सोपवले आहे. टी-२० आशिया चषकाची सुरूवात या महिन्यात २७ ऑगस्ट पासून होणार आहे. श्रीलंकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे या स्पर्धेचे आयोजन यूएईत होणार आहे.

मात्र याआधी श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरूद्धच्या मालिकांचे यजमानपद सांभाळले होते. मात्र आशिया चषक ही एक मोठी स्पर्धा असल्यामुळे त्यांनी यजमानपद नाकारले. अशा परिस्थितीत सर्व काही सुरळीत पार पडण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याचे आयोजन यूएईच्या धरतीवर केले आहे. अखेर आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतEnglandइंग्लंडSri Lankaश्रीलंकाasia cupएशिया कप