CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:50 PM2022-08-09T14:50:51+5:302022-08-09T14:54:30+5:30

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार पार पडला.

10 Sri Lankan athletes who came to England for the Commonwealth Games have gone missing | CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आलेले १० खेळाडू बेपत्ता; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश 

googlenewsNext

नवी दिल्ली : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) चा थरार पार पडला. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७२ देशातील ५ हजारहून अधिक थलीट सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी भारताच्या शेजारील देश श्रीलंका देशातील देखील खेळाडू आले होते, मात्र राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर १० श्रीलंकन खेळाडू बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ थलीट आणि एका मॅनेजरचा समावेश आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे म्हणूनच हे १० जण आपल्या देशात परतण्यास तयार नाहीत असेही बोलले जात आहे. 

दरम्यान, बेपत्ता झालेल्या खेळाडूंना शोधण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. श्रीलंका मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील स्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोकांना इंधनासाठी ५-६ दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेचे नागरिक देश सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ५१ अधिकाऱ्यांसह १६१ सदस्यांचा गट श्रीलंकेतून बर्गिंहॅमला गेला होता. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंवरही संकट आले असले, तरी राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि तेथील क्रिकेट मंडळाच्या मदतीने त्यांना बर्मिंगहॅमला जाता आले होते.

आर्थिक संकटामुळे यूएईत आशिया चषकाचे आयोजन
श्रीलंकेत सध्याच्या घडीला सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. देशातील नागरिकांना गरजू वस्तूंसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ चे आयोजन श्रीलंकेत न होता यूएईच्या धरतीवर होणार आहे. आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेने यूएईला सोपवले आहे. टी-२० आशिया चषकाची सुरूवात या महिन्यात २७ ऑगस्ट पासून होणार आहे. श्रीलंकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे या स्पर्धेचे आयोजन यूएईत होणार आहे.

मात्र याआधी श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरूद्धच्या मालिकांचे यजमानपद सांभाळले होते. मात्र आशिया चषक ही एक मोठी स्पर्धा असल्यामुळे त्यांनी यजमानपद नाकारले. अशा परिस्थितीत सर्व काही सुरळीत पार पडण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याचे आयोजन यूएईच्या धरतीवर केले आहे. अखेर आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया कप यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 


 

Web Title: 10 Sri Lankan athletes who came to England for the Commonwealth Games have gone missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.