Yukta Patil first in International Viral Singing Competition | आंतरराष्ट्रीय ‘व्हायरल गायन’ स्पर्धेत युक्ता पाटील सर्वप्रथम  

आंतरराष्ट्रीय ‘व्हायरल गायन’ स्पर्धेत युक्ता पाटील सर्वप्रथम  

- अनंत पाटील
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या ‘द व्हायरल सिंगर सीझन १’ या डिजिटल रिअ‍ॅलिटी शो व्हायरल गायन स्पर्धेत नवी मुंबईतील तुर्भे गावची युक्ता पाटील ही गायिका भारतातून प्रथम पहिली आली आहे.
‘द व्हायरल सिंगर’ आॅनलाइन स्पर्धेत देश-विदेशातील ५,४४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात दुबई, युरोप, ब्राझील, सिंगापूर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. कोको हाय व अ‍ॅल्गोल फिल्म यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. युक्ता पाटील उपांत्य फेरीपर्यंत पोहोचल्यानंतर तिने गायनाचा सराव आणखी वाढवला. हजारो प्रेक्षकांची मने जिंकून अखेर ती अंतिम फेरीत पोहोचली. या गायन स्पर्धेच्या अखेरच्या क्षणी सहा ते सात फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातून युक्ताची निवड करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनच्या अनुषंगाने ही आॅनलाइन स्पर्धा सुरू होती. युक्ता पाटील ही वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे.

Web Title: Yukta Patil first in International Viral Singing Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.