पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी युवकांची
By Admin | Updated: July 16, 2015 22:54 IST2015-07-16T22:54:47+5:302015-07-16T22:54:47+5:30
पर्यावरण कायद्याचे पालन होत नसल्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे प्रतिपादन

पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी युवकांची
मुरुड : पर्यावरण कायद्याचे पालन होत नसल्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे प्रतिपादन सर एस. ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय गद्रे यांनी केले.
सर एस.ए. हायस्कूल मुरुड येथे हरित महाराष्ट्र अभियान २०१५ अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र यांच्यामार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी हितगुज करताना गद्रे बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी गुलमोहर, काशिद, शमी आदी वृक्षांची लागवड केली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी मनोहर पाटील, लागवड कोतवाल सागर पाटील आदी उपस्थित होते.
मनोहर पाटील यांनी पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या येवू घातली असून जनजागृतीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)