युवा पिढी ही राष्ट्रीय संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:11 IST2016-04-22T02:11:50+5:302016-04-22T02:11:50+5:30

आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे,

Young generation is the only national wealth | युवा पिढी ही राष्ट्रीय संपत्ती

युवा पिढी ही राष्ट्रीय संपत्ती

नवी मुंबई : आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सिडको कर्मचारी संघटना आणि सिडको बी.सी. एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको भवन येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपला देश आर्थिक विकास, पाणी नियोजन व बेरोजगारी यासारख्या समस्यांनी ग्रासला आहे. आदर्श लोकशाहीसाठी प्रत्येकाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. या प्रक्रियेतूनच देशाचा विकास साधला जाईल, असे मत आंबेडकर यांनी यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे मत गगराणी यांनी आपल्या भाषणातून मांडले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे.टी. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Young generation is the only national wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.