आज शहरात योगपर्व

By Admin | Updated: June 21, 2016 01:42 IST2016-06-21T01:42:22+5:302016-06-21T01:42:22+5:30

सिडको आणि आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

Yogpurav in the city today | आज शहरात योगपर्व

आज शहरात योगपर्व

नवी मुंबई : सिडको आणि आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सकाळी ७ ते १० या वेळात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दोन सत्रामध्ये होणार असून सकाळी ६.३० ते ७ वाजेपर्यंत पूर्वतयारी, सकाळी ७ ते ७.४५ योग अभ्यास हे पहिले सत्र होणार आहे. दुसऱ्या सत्रात सकाळी ७.४५ ते ८.१५ या वेळेत योगसंबंधित नृत्य, व्यायाम प्रकार घेतले जाणार आहे आणि सकाळी ८.१५ ते ९ वाजेपर्यंत योग अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये शहरातील विविध शाळाही सहभागी होणार आहेत. या ठिकाणी मोफत आरोग्य व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सीबीडीमधील भारती विद्यापीठ शाळा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, कोपरखैरणेतील ज्ञान विकास संस्था, खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूल, नेरुळमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वाशीतील सेंट लॉरेन्स आदी शाळांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहे. खारघरमधील आयटीएम कॉलेजमध्ये पोलिसांकरिता विशेष योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत पोलिसांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ येथे योग प्रशिक्षक साबीर शेख यांच्या वतीने सेक्टर २९ येथे योगाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीबीडी सेक्टर ९ परिसरातील अंबिका योग कुटीरच्या वतीनेही योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून योगासनांच्या माध्यमातून योग दिवस साजरा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Yogpurav in the city today