शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लावणारे वर्ष, घरफोड्यांनी हादरले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 8:00 AM

पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.

- सुर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता.तपासकामात पोलिसांना चक्रावून सोडतील, असे गुन्हे सरत्या वर्षात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात घडले आहेत. सराईत गुन्हेगारांनी कसलाही ठोस पुरावा मागे न सोडता केलेल्या या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात जुईनगर येथील बडोदा बँकेची घरफोडी देशभर चर्चेचा विषय बनली. भुयार खोदून बँक लुटण्याचा देशातला दुसरा व राज्यातला पहिलाच गुन्हा होता. कसलाही ठोस पुरावा मागे नसताना केवळ सीसीटीव्ही व इतर काही तंत्रज्ञानाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत मुख्य सूत्रधाराला पकडून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. या गुन्ह्याच्या काही दिवसअगोदरच वाशीत व्यापाºयाच्या घरी जबरी दरोडा पडला होता. तपासाअंती पोलिसाची पत्नी अनिता म्हसाणे गुन्ह्याची सूत्रधार असल्याचे समोर आले. तर काही दिवसांतच तिचा पोलीस पती मुकुंद म्हसाणे यालाही फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. तर एपीएमसीमधून ९० लाखांचे तर कळंबोली येथून चार कोटींचे सिगारेटचोरीचे दोन गुन्हे उघड करण्याचे आव्हान असतानाही ते गुन्हे उघड केले.मे महिन्यात रबाळे एमआयडीसी हद्दीत गटारात शिर व पाय नसलेले प्रियांका गुरव या नवविवाहितेचे धड सापडले होते. प्रेमसंबंधातून लग्नाला भाग पाडल्याने सासरच्या व्यक्तींनीच लग्नाच्या चौथ्या दिवशीच तिची हत्या करून तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यापैकी रबाळे एमआयडीसीमध्ये टाकलेल्या धडाच्या मानेवरील टॅटोवरून पोलिसांनी अत्यंत शिताफीने मृतदेहाची ओळख पटवून सासरच्यांना अटक केली होती. तर मे महिन्यात दारावे येथील मयूरा ज्वेलर्सची भिंत फोडून सुमारे ५० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. हा गुन्हा अवघ्या रेल्वेच्या तिकिटावरून उघड करून पोलिसांनी टोळीला अटक केली. ज्वेलर्सच्या मागचे घर भाड्याने घेऊन हा दरोडा टाकण्यात आला होता. ५५ लाखांच्या खंडणीसाठी लहान मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार तळोजा येथे घडला होता. या गुन्ह्यात चिमुरड्याच्या जीविताला धोका निर्माण झाला होता; परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुलाची सुखरूप सुटका करून गुन्हेगारांना अटक केली होती.बहुतांश गुन्हे केवळ तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना उघड करावे लागले आहेत. त्याकरिता गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकाने दाखवलेले कौशल्य गुन्हे उघड होण्यास महत्त्वाचे ठरले आहे. तर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवार्इंच्या माध्यमातून अमली पदार्थविक्रेत्यांचे कंबरडे मोडून काढले आहे. वर्षभरात दहाहून अधिक कारवाया करून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.५० जणांवर मोक्कासरत्या वर्षात आयुक्तालय क्षेत्रामध्ये घडलेल्या सुमारे तीन हजार ८०० गुन्ह्यांपैकी सुमारे २५०० गुन्हे परिमंडळ एकमध्ये घडले आहेत. त्यामध्ये वाहनचोरी, हत्या, दरोडे, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे; परंतु चालू वर्षात पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, तसेच मोक्काच्या केलेल्या कारवायांमुळे २०१६च्या तुलनेत २०१७मध्ये महत्त्वाच्या गुन्ह्यांत घट झालेली आहे. तर उघड केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. सरत्या वर्षात सात टोळ्यांमधील ५०हून अधिक गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई झालेली आहे.जेएनपीटीवर सायबर हल्लाजेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली जूनला हॅक करण्यात आली होती. कंपनीचे सुमारे २७० संगणक व लॅपटॉप व्हायरसमुक्त करण्यासाठी हॅकरने खंडणी मागितली होती. अशा प्रकारे खंडणीचा हा शहरातील पहिलाच गुन्हा आहे. त्यानंतर काही दिवसांतच नवी मुंबई पोलिसांची वेबसाइट दोनदा हॅक झाली होती.परिमंडळ एक मध्ये वर्षभरात दरोड्याच्या तीन मोठ्या घटना घडल्या असून, त्या सर्वांची उकल करण्यात आलेली आहे.घरफोडीचे २३४ गुन्हे घडले असून, त्यापैकी ६६ गुन्हे दिवसा तर १८८ रात्री घडले आहेत.हत्येचे २४ गुन्हे घडले असून, त्यापैकी २३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.वाहनचोरी२०१७ मध्ये ३५६२०१६मध्ये ४८०घरफोडी२०१७ मध्ये २३४२०१६ मध्ये ३२०प्राणांतिक अपघात२०१७ मध्ये १०८१०१६ मध्ये ११६

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई