शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:19 AM

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुनर्वसन प्रक्रियेत अद्यापि काही अडथळे आहेत; परंतु येत्या काळात तेही दूर केले जातील. एकूणच विमानतळाचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच म्हणजेच, डिसेंबर २०१९मध्ये पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याची माहिती सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिली.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११६० हेक्टर जागेवर सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीड फिल्ड पद्धतीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. २०१९पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रकल्पपूर्व सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, उलवे नदीचे पात्र बदलणे व विमानतळाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे, या कामांचा समावेश आहे. सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी प्रसारमाध्यमांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बेलापूर येथील सिडको गेस्ट हाउसमध्ये पत्रकारांसमोर या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३००० कुटंबांचे वडघर आणि वहाळ येथे विकसित भूखंड देऊन पुनर्वसन केले जाणार आहे. आतापर्यंत १९७७ भूखंड विकसित करण्यात आले असून, उर्वरित फेब्रुवारी २०१८पर्यंत विकसित केले जातील. एकूण प्रकल्पबाधितांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांनी स्थलांतरण करून विकसित भूखंडांचा ताबा घेतला आहे. तर ७५० प्रकल्पबाधितांनी भूखंडांचे करारनामे केल्याची माहिती प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या एक-दोन मागण्या प्रलंबित आहेत. राज्य सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले. विमानतळ उभारणीचे काम जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत प्रकल्पपूर्व कामे पूर्ण करून नियोजित विमानतळाची जागा कंपनीच्या ताब्यात दिली जाईल. डिसेंबर २०१९मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, विमानतळ प्रकल्पाचे मुख्य अभियंता आर. बी. धायटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ