चिमुकल्याच्या मृतदेहासह महिलेची वाशी खाडी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:38 IST2021-02-10T01:38:05+5:302021-02-10T01:38:20+5:30

वाशी खाडीपुलावर गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली.

Woman commits suicide with Chimukalya's body | चिमुकल्याच्या मृतदेहासह महिलेची वाशी खाडी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

चिमुकल्याच्या मृतदेहासह महिलेची वाशी खाडी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

नवी मुंबई : एक वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहासह महिलेने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेदरम्यान पोलिसांनी तिच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये एक वर्षाच्या मुलाचे धड व शीर आढळून आले. हा मृतदेह सोबत घेऊन तिने रेल्वेने पुणे ते वाशीपर्यंत प्रवास केला.

वाशी खाडीपुलावर गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वेतून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे आढळले. बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक वर्षाच्या मुलाचे धड व शीर आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा पुण्यातून ती पळून आली असल्याचे समोर आले. एक वर्षांपूर्वी तिने मुलाला जन्म दिला होता. या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवस आधीच ती निघून गेली होती. यादरम्यान तिनेच मुलाची हत्या करून शीर व धड वेगळे करून बॅगमध्ये स्वत:सोबत ठेवून मुंबई गाठल्याचा पोलिसांना संशय आहे. बॅगेमध्ये मृतदेह सोबत घेऊन तिने पुणे ते वाशीपर्यंत रेल्वेने प्रवास केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडले असून यातूनच तिने हे कृत्य केले असावे, अशीही शक्यता असल्याचे पो. नि. विष्णू केसरकर यांनी सांगितले. तरीही याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

Web Title: Woman commits suicide with Chimukalya's body