महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:37 IST2019-09-16T23:37:30+5:302019-09-16T23:37:36+5:30

नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

A woman cheats Rs | महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक

महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक

पनवेल : नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हर्षला सुरेंद्रपाल शैलानी असे फसवणूक केलेल्या महिलेचे नाव आहे.
हर्षला शैलानी यांचे इंटेरियल डिझायनरमध्ये शिक्षण झाले आहे. त्यांना मोबाइलवर फोनवर एका मुलीने स्वत:चे नाव रिया सेन असे सांगून ती नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे नाव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शार्ट लिस्ट झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तासभराने आदित्य वर्मा नामक व्यक्तीचा त्यांना फोन आला व त्याने १ हजार आठशे रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर पुन्हा १० हजार २०० रुपये भरण्यास सांगितले व कंपनी जॉइन केल्यानंतर सर्व पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यांनी ते पैसे भरले. पुन्हा आदित्य वर्मा यांनी फोन करून २५ हजार ३०० रुपये भरण्याबाबत सांगितले. मात्र त्यांनी यावेळी १० हजार रुपये भरले. त्यानंतर शैलानी यांनी त्यांच्या क्रमांकावर फोन केला असता एका व्यक्तीने फोन उचलला व आदित्य वर्मा वारले असल्याचे सांगितले. त्यानंतर नोकरी डॉट कॉमच्या वेबसाईटवरून मोबाइल क्रमांक घेवून त्यावर आदित्य वर्मा यांच्याबाबत खात्री केली असता अशा नावाची कोणीही व्यक्ती तेथे नोकरी करीत नसल्याचे सांगितले.

Web Title: A woman cheats Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.