पालिकेच्या कचराकुंड्या वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:30 IST2019-07-10T23:30:04+5:302019-07-10T23:30:20+5:30

पनवेलमधील प्रकार : कचरा उचलण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष

Without using the trash of the corporation | पालिकेच्या कचराकुंड्या वापराविना

पालिकेच्या कचराकुंड्या वापराविना

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून शहरात कचराकुंड्या (टिष्ट्वन बिन्स) बसविल्या आहेत; परंतु त्याचा फारसा वापर होत नाही. ओला व सुका कचराही एकाच ठिकाणी टाकला जात आहे. बिन्समधील कचराही साफ करण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.


बिन्स बसविण्यासाठी जवळपास ८० लाखांचा खर्च आलेला आहे. प्रत्येकी टिष्ट्वन बीनची किंमत जवळ १४,५०० आहे. पालिकेने २० प्रभागात चौकात व मोक्याच्या ठिकाणी हे बीन बसविले आहेत. विशेष म्हणजे, सुका कचरा व ओला कचरा नेमलेल्या डब्यात न टाकता सर्रास दोन्ही डब्यात ओला व सुका कचरा टाकला जात आहे. अनेक वेळा या बीनमधील कचराही काढला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली जाते. पालिकेने राबविलेला हा उपक्र म अतिशय स्तुत्य असला तरी नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती नसल्याने या टिष्ट्वन बिनचा वापर योग्यरीत्या होत नसल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी संबंधित टिष्ट्वन बीन चोरीला गेल्याची तक्रारदेखील पालिकेने दाखल केली होती. यासंदर्भात एका इसमावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अर्ध्यापेक्षा जास्त बिन्स मोडकळीस आले आहेत. मोठ्या संख्येने संबंधित बीन चोरीला गेलेले आहेत. पालिकेने यासंदर्भात गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे खारघरमधील नागरिक युवराज वर्कड यांनी व्यक्त केलीे.


घनकचरा व्यवस्थापन विभागानेही या बाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. संबंधित बीन बसवून एक वर्षाचा कालावधीही लोटला नाही. त्यापूर्वीच झालेली ही अवस्था खरोखरच गंभीर आहे. विशेष म्हणजे, हे बीन बसविताना पालिकेच्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंत्याच्या मार्फत बसविले नाहीत. आरोग्य विभागातील सफाई कामगार इतर कर्मचाऱ्यांनी हे बीन बसविले असल्याने संबंधित बीनची जागा चुकीची निवडली गेल्याने अनेक ठिकाणी हे बीन पादचारी, वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. पावसाळ्यात मोठ्या संख्येने संबंधित बीन जागेवरच उन्मळून पडलेले आहेत. पनवेलसह कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, तळोजे आदी सर्वच ठिकाणी या टिष्ट्वन बीनची हीच अवस्था पाहावयास मिळत आहे. संबंधित प्रकारासंदर्भात पालिकेचे उपायुक्त श्याम पोशेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Without using the trash of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.