रेमडेसिविरला डॉक्टरांचा आग्रह कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:53 IST2021-04-19T00:53:23+5:302021-04-19T00:53:28+5:30
निधी चौधरी : डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेला जागण्याची वेळ

रेमडेसिविरला डॉक्टरांचा आग्रह कशासाठी ?
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोनासाठी रामबाण औषध नाही. तरीदेखील खासगी, सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टर या इंजेक्शनचा वापर कोविड रुग्णांवर करीत आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) तसेच राज्यातील कोविड आजारावर मात करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने स्पष्ट सांगितले आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एक नवीन संकट निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी डॉक्टरांची कानउघाडणी करीत डॉक्टरांनी घेतलेल्या शपथेला जागून गरज नसताना रेमडेसिविरचा वापर टाळण्याचे डॉक्टरांना व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे.
टास्क फोर्सने म्हटल्यावर रुग्ण ऑक्सिजनवर असतानाच त्याच्यावर रेमडेसिविरचा वापर करावा. तसेच कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पाच दिवसांच्या कालावधीत इंजेक्शनचा वापर प्रभावी ठरू शकतो. मात्र, असे असताना प्रत्येक रुग्णासाठी हे इंजेक्शन सुचविणे, हे चुकीचे आहे. ही बाब डॉक्टरांना माहिती असल्याने रुग्णांसाठी इतर पर्यायी औषधांचा वापर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी डॉक्टरांना केलेल्या आवाहनात स्पष्टपणे म्हटले आहे.
मागणी वाढल्याने सध्याच्या घडीला रेमडेसिविर इंजेक्शचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे त्याचा काळा बाजार वाढल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी डॉक्टरांना दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे.
नातेवाइकांची धावपळ थांबवावी
nवैद्यकीय क्षेत्रात आल्यावर डॉक्टर घेत असलेली शपथ म्हणजेच डू नो हार्म म्हणजेच (कोणतीही इजा होऊ देणार नाही) मात्र असे असतानादेखील गरज नसताना इंजेक्शनची मागणी केली जात असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
nजागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच टास्क फोर्सने कोरोनावर सुचविलेल्या औषधोपचारांचा वापर करून गरज नसताना रेमडेसिविर प्रत्येक रुग्णासाठी सुचवून रुग्णांच्या नातेवाईकांची चाललेली धावपळ थांबविणे डॉक्टरांच्या हातात आहे.