घारापुरी बेटावरील तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: May 24, 2017 01:32 IST2017-05-24T01:32:00+5:302017-05-24T01:32:00+5:30
इतिहास काळापासूनच महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या घारापुरी बेटावरील डोंगरमाथ्यावर प्रचंड

घारापुरी बेटावरील तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर
मधूकर ठाकूर।
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : इतिहास काळापासूनच महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या घारापुरी बेटावरील डोंगरमाथ्यावर प्रचंड आकाराच्या दोन्ही तोफांनी शंभरी पार केली आहे. या तोफा सध्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असल्या तरी त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे घारापुरी बेटावरील दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा संरक्षण खात्याच्या दुर्लक्षामुळे दृष्टीआड होण्याच्या मार्गावर लागला आहे.
इ. स. १७७४ मध्ये घारापुरी बेट इंग्रजांनी ताब्यात घेतले. १९४७ पर्यंत घारापुरी बेटाचा ताबा इंग्रजांकडे होता. इतिहास काळापासून महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या व मुंबईच्या संरक्षणासाठी इंग्रजांनी १९०५ आणि १९०६ साली पोलादी प्रचंड आकाराच्या दोन तोफा घारापुरी बेटावरील डोंगर माथ्यावर बसविल्या होत्या. उत्तर दक्षिण दिशेला बसविण्यात आलेल्या दोन्ही तोफांना समांतर भुयारी मार्गही बनविण्यात आले आहेत. तसेच दारूगोळा साठविण्यासाठी आणि पुरविण्यासाठी खंदकही खोदले आहेत. सव्वा दोन फूट व्यासाच्या आणि साधारणत: २१ फूट लांबीच्या तोफा पुढे निमुळत्या होत गेल्या आहेत. चहुबाजूंनी गोळाबारी करण्याची सोय असलेल्या तोफा पोलादी धातूच्या आहेत.