नवी मुंबईतील एमआयडीसीत उद्या पाणी पुरवठा बंद
By नामदेव मोरे | Updated: June 27, 2024 17:29 IST2024-06-27T17:29:40+5:302024-06-27T17:29:58+5:30
दिघा, रबाळे, तुर्भे ते शिरवणे, नेरूळ परिसरातील बहुतांश सर्व झोपडपट्यांना एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामुळे गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून शनिवारीही कमी दाबाने पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील एमआयडीसीत उद्या पाणी पुरवठा बंद
नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमधील रहिवासी क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जहवाहिनीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी २८ जुनला झोपडपट्टी विभागातील पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून बेलापूर ते ऐरोली दरम्यान परिसराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु ठाणे बेलापूर रोडच्या दुसऱ्या बाजूला औद्योगीक वसाहतीमधील सर्व झाेपडपट्ट्यांना एमआयडीसीच्या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा केला जात आहे. दिघा, रबाळे, तुर्भे ते शिरवणे, नेरूळ परिसरातील बहुतांश सर्व झोपडपट्यांना एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जात आहे. एमआयडीसीने पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आवश्यक दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामुळे गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून शनिवारीही कमी दाबाने पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.