केगावला टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: July 17, 2015 22:33 IST2015-07-17T22:33:40+5:302015-07-17T22:33:40+5:30
पाणी टंचाईग्रस्त केगावातील नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हेटवणे धरणातून टँकरद्वारे दररोज २० हजार लिटर्स पाणीपुरवठा केला जात

केगावला टँकरद्वारे पाणीपुरवठा
उरण : पाणी टंचाईग्रस्त केगावातील नागरिकांना सिडकोच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. हेटवणे धरणातून टँकरद्वारे दररोज २० हजार लिटर्स पाणीपुरवठा केला जात असल्याने तूर्तास केगाव ग्रामस्थांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे.
सतरा हजार लोकसंख्या असलेल्या केगावात मागील काही वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. याआधी दोन दिवसाआड मिळणारे पाणी आता ८-१० दिवसांनी मिळू लागले आहे. अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे मात्र रहिवाशांवर भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एमआयडीसीकडून मागणी करूनही ६ इंचांची पाइपलाइन टाकून मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा ऐन पावसाळ्यातही तीव्र झाल्या आहेत. केगाववासीयांना जाणविणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी शिवसेना सदस्य कमलाकर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली सरपंच हेमांगी ठाकूर आणि शिष्टमंडळाने उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्याकडे पाणीसमस्या दूर करण्याची विनंती केली होती. सिडकोनेही आमदारांच्या मागणीची दखल घेत मागील रविवारपासून केगाव ग्रामपंचायतीला टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)