नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
By नामदेव मोरे | Updated: December 27, 2023 19:49 IST2023-12-27T19:48:38+5:302023-12-27T19:49:29+5:30
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासह पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

नवी मुंबई खारघर कामोठेत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई : मोरबे धरण ते दिघा दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम २९ डिसेंबरला करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी नवी मुंबई, खारघर, कामोठे परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासह पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण ते दिघा दरम्यानच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा शुक्रवार २९ डिसेंबरला सकाळी १० ते रात्री १० दरम्यान बंद ठेवला जाणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा होणार नाही. ३० डिसेंबरलाही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.