शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: September 5, 2015 03:09 IST

एमजेपीकडून वारंवार घेण्यात येणारे शटाडाऊन तसेच जलशुद्धी केंद्रावर सुरू असलेला विजेचा लपंडाव, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे गेल्या काही

पनवेल : एमजेपीकडून वारंवार घेण्यात येणारे शटाडाऊन तसेच जलशुद्धी केंद्रावर सुरू असलेला विजेचा लपंडाव, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सिडको वसाहतीत खंडित पाणीपुरवठा होत आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे नवीन पनवेलमधील नागरिक त्रस्त असून, सेक्टर-६ मधील परिस्थित अतिशय बिकट आहे. नवीन पनवेल आणि कळंबोली नोडला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र ते पनवेल यादरम्यान टाकलेल्या जलवाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. झोपडपट्टीधारकांकडूनही अनेकदा या जलवाहिन्या फोडण्यात येतात. त्यामुळे पाण्याचा अपव्ययही वाढला आहे. सुमारे २५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे एमजेपीनेही मान्य केले आहे. फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एमजेपीकडून सातत्याने शटडाऊन घेण्यात येत असल्याने सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. गुरुवारी एमजेपीने शटडाऊन घेऊन तीन ठिकाणी जलवाहिन्यांची दुरुस्ती केली. सिडकोने केलेल्या दाव्यानुसार, याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आली होती. मात्र जलवाहिन्यांची दुरुस्ती झाल्यावर भोगरपाडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पंपहाऊस बंद पडले. अखेर शुक्रवारी सकाळी दहानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. अशीच परिस्थिती खांदा वसाहत आणि कळंबोलीत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने इमारतीत वरच्या मजल्यावर पाणी पोचले नाही. नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे, मात्र ते एमजेपीकडे बोट दाखवीत असल्याचे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे किरण तावदारे यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)