शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

नवीन पनवेलमध्ये पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:53 IST

नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कळंबोली - नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विरोधात सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाला गुरु वारपर्यंतचा अल्टिमेटम देत हंडा मोर्चाचा इशारा दिला .एमजेपीकडून मागणीप्रमाणे सिडकोला पाणी दिले जात नाही. कारण जुनाट झालेल्या जलवाहिन्यांना फुटल्या आहेत. त्याचबरोबर टाटा पॉवर कंपनीकडून रविवार आणि सुटीच्या दिवशी शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे पाताळगंगा नदीत पाणी सोडले जात नसल्याने एमजेपीला पाणी मिळत नाही. त्याचा परिणाम सिडको वसाहतीतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. नवीन पनवेलमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सिडको इमारतींना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या ठिकाणी पाणी साठवणूक करण्याकरिता टाक्या नाहीत. त्यामुळे सिडकोने सोडलेल्या पाण्यावर येथील रहिवाशांना अवलंबून राहावे लागते. गेल्या महिन्यापासून सेक्टर १३, १४ व १५ या विभागात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. येथील ए टाईप, बी-१0 , ई-१ मधील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्र ारी करु नही पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांनी माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर हल्लाबोल करण्यात आला. सिडकोचे सहाय्यक अभियंता राहुल सरवदे यांना जाब विचारण्यात आला. अनियमित वीजपुरवठा, एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्या अशी कारणे देत मोर्चेकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला मुबलक पाणी देण्याची जबाबदारी सिडकोचीच असल्याची भूमिका घरत यांनी घेतली. त्यांनी या प्रश्नाबाबत अधीक्षक अभियंता प्रशांत काळे यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.नवीन पनवेलमध्ये मुबलक पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. याकरिता सिडको उपाययोजना करत नाही म्हणून आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु वारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येईल.- सुनील घरत,माजी नगराध्यक्ष, पनवेलएमजेपीकडून गेल्या काही दिवसांपासून कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याकरिता एमजेपीकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.- दिलीप बोकाडे,कार्यकारी अभियंता सिडको .

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpanvelपनवेल