शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

धान्यासह सिमेंटवर जलवर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:21 IST

छतातून होणारी गळती थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : तुर्भे रेल्वे यार्डातील धान्य व सिमेंटच्या साठ्यावर जलवर्षाव होऊ लागला आहे. छतातून होणारी गळती थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लॅटफॉर्मची प्रचंड दुरवस्था झाली असून, स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.मुंबई व उपनगरांमधील प्रमुख रेल्वे धक्क्यांमध्ये तुर्भेचा समावेश होत आहे. याठिकाणी देशाच्या विविध भागातून तांदूळ, गहू व सिमेंट मुंबईमध्ये येत असते. प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगनमधून साहित्य याठिकाणी आणले जाते. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचे नुकसान होऊ लागले आहे. रेल्वेतून येणारा माल प्लॅटफॉर्मवर ठेवला जात आहे. अनेक ठिकाणी छताची दुरवस्था झाली आहे. पत्रे तुटले असून पावसाचे पाणी सिमेंट व धान्यावर पडू लागले आहे. नुकसान होऊ नये यासाठी साहित्यावर ताडपत्री टाकावी लागत आहे. ताडपत्री उडून नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी करूनही छताची दुरुस्ती करण्याकडे लक्ष दिले जात नाही. मुसळधार पाऊस सुरू असताना नुकसान टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्लॅटफॉर्मचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी धक्का तुटलेला आहे. ट्रक व कंटेनर धक्क्याला व्यवस्थित लावता येत नाही. यामुळे माथाडी कामगारांना त्रास होत आहे.तुर्भे रेल्वे यार्डातील रुळावरील कचराही उचलला जात नाही. पूर्ण यार्डात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाण व साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कचरा साफ करण्यासाठी ठोस यंत्रणाच उपलब्ध नाही.रेल्वे यार्डामध्ये अर्धा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. उर्वरित अर्ध्या भागामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी अवजड वाहनांचा वावर असून अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक खचू लागले आहेत. याठिकाणी शेकडो कामगार काम करत आहेत. कामगारांसाठीही फारशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.२५ जुलैला बैठकमहाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने तुर्भे व मुंबई परिसरातील सर्व रेल्वे धक्क्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गैरसोयीचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसू लागला असून व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्या सोडविण्यासाठी २५ जुलैला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला माथाडी व इतर संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी २० जुलैला रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक होणार असून त्यामध्ये सर्व समस्या सोडविण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. यामुळे आता कामगारांसह व्यावसायिकांचे लक्ष २० व २५ जुलैला होणाºया बैठकीकडे लागले आहे.तुर्भे रेल्वे धक्क्यावर छतामधून पाणी गळत आहे. सिमेंट व धान्य भिजू नये यासाठी ताडपत्रीचा वापर केला जात आहे. धक्क्याची दुरवस्था झाली असून त्याचा त्रास माथाडी कामगारांना होत आहे. स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे.- बाबाजी चौधरी,माथाडी कामगार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई