शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:42 IST

पावसाची दडी : मोरबे धरणातील पातळी खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जुलै महिना संपत आला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. पुढील दोन महिन्यांत अपेक्षित पाऊस न पडल्यास शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.मुंबईनंतर राज्यात स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर एवढी असून, धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण भरण्यासाठी तीन हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची गरज आहे. २६ जुलैपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची सध्याची पातळी ७६.७0 मीटर इतकी आहे. पुढे पावसाने दडी मारल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले होते. ९८ वर्षांनंतर प्रथमच धरण परिसरात जवळजवळ पाच हजार मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठी शिल्लक राहिला. मे, २0२0 पर्यंत धरणातील पाण्याची पातळी ७४ मीटर इतकी होती. जून आणि जुलै महिन्यात यात केवळ २.७0 मीटर इतकी वाढ झाली आहे, तर या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त १0८१.८0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण धरण्यासाठी आणखी २000 ते २५00 मिमी पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी तिवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर मोरबे धरणाची पाटबंधारे विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. तेव्हा नवीन अभियंत्यांना अभ्यास करण्यासाठी हे धरण दाखविले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न झाले आहे. या धरणातून शहराला चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा केला जातो. २0१८ मध्ये २५ जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते, तर २0१९ मध्ये ४ आॅगस्टला धरण ओव्हरफ्लो झाले होते. या वर्षी जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कोसळणाºया पावसावरच नवी मुंबईकरांवरील पाणीकपातीचा निर्णय अवलंबून आहे.धरणातून सातगावांना पाणीपुरवठाच्महापालिका मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास मुबलक पाणीपुरवठा करते. त्यासाठी धरणातून दररोज ४२0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.च्नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे आणि मोरबे धरण परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Damधरण