शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाधनगृहांची देखभाल वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2016 03:28 IST

स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु दुसरीकडे शहरात नागरिकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेच नाहीत. जी आहेत त्यांची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहरात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवत असल्याचा दिखावा करू लागली आहे. शहरात विविध विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबर विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. हागणदारीमुक्त शहर बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी पुरेशी शौचालये उभारण्यापूर्वीच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रोज एक ते दोन विभागांत जाऊन महापालिकेचे अधिकारी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून महापालिकेच्या कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसूल केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येत आहे. रोज किती जणांवर कारवाई केली याचा तपशील प्रसारमाध्यमांकडे पाठविला जात आहे. परंतु दुसरीकडे कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. उपलब्ध प्रसाधनगृहांची साफसफाई ठेवली जात नाही. कारवाई करण्यापूर्वी पुरेशी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मनपाने बांधलेल्या प्रसाधनगृहांची योग्य देखभाल केली जात नाही. एपीएमसीमध्ये मनपाच्या प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. अनेक संस्थांचा देखभालीचा ठेका संपल्यानंतरही नवीन ठेकेदारांची नियुक्ती केलेली नाही. अनेक प्रसाधनगृहे मोडकळीस आली आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्ती नाहीराष्ट्रवादी काँगे्रसचे नेरूळ येथील नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेक्टर ६मधील उद्यानाजवळ पालिकेने बांधलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. गतवर्षी नवरात्रीपासून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रामलीला मैदानाजवळील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. तुटलेले दरवाजेही बसविले जात नसून प्रशासन फक्त शहरात होर्डिंग लावून ‘हागणदारीमुक्त शहरा’ची घोषणा करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.