शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

विरार-अलिबाग काॅरिडॉरमुळे महामुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, पहिला टप्पा ९८ किमी; ४१ पूल, ५१ उड्डाणपूल, ३९ भुयारी मार्ग बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:50 IST

मुंबई शहर आणि नवी मुंबईला त्याचा मोठा फायदा होऊन वाहतूक पोलिसांची डोकेदुखी दूर होणार आहे.

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील बहुचर्चित विरार-अलिबाग काॅरिडॉर अस्तित्वात आल्यानंतर वसई-विरारसह मीरा-भाईंदर, मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांच्या क्षेत्रातील अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे. मुंबई शहर आणि नवी मुंबईला त्याचा मोठा फायदा होऊन वाहतूक पोलिसांची डोकेदुखी दूर होणार आहे. 

प्रकल्पात नवघरे ते बालवली हा पहिला टप्पा ९८ किमीचा असून, त्यात ४१ पूल, ५१ उड्डाणपूल, ३९ वाहनचालक भुयारी मार्ग, चार पादचारी मार्ग, नऊ आंतरबदल राहणार आहेत. या मार्गासाठी एकूण १०६२.०७ हेक्टर जमीन लागणार असून, त्यात ३८.८० हेक्टर वनजमीन, १४५ हेक्टर सरकारी जमीन आणि ८७८ हेक्टर खासगी जमीन लागणार आहे.

ही सर्व जमीन संपादित करावी लागणार असून, तिची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी भूसंपादनास मोठा विरोध होत आहे. उरण-पनवेलसह पेणमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अद्याप जमीन दिलेली नाही.

सात महामार्गांना जोडणार विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७, मुंबई-बडोदरा एक्स्प्रेस-वे सह भिवंडी बायपास जोडण्यात येणार आहे. सात महामार्गांना तो जोडण्यात येणार असून, त्याचा सर्वाधिक फायदा भिवंडीच्या गोदामपट्ट्यासह कल्याण येथील प्रस्तावित ग्रोथ सेंटर, नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर यांना होणार आहे. विमानतळ, गोदामपट्टा आणि जेएनपीटीतून बाहेर पडणारी अवजड वाहतूक थेट कॉरिडॉरमार्गे त्या-त्या महामार्गाद्वारे बाहेर पडणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईTrafficवाहतूक कोंडी