शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळी’; आगरी कोळ्यांची हावलूबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:27 PM

आगरी-कोळी समाज बांधवांचा पारंपरिक उत्सव

अनंत पाटीलनवी मुंबई : जायफल टेंगता उन्गवला दवणा, दवणा नाय गो दवण्याची कारी... हे गीत कानावर पडले की, समजायचे आगरी-कोळी बांधवांची होळीची लगबग सुरू झाली. होळी म्हणजे होलिकोत्सव. आगरी-कोळी समाज हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. सध्या शहरात या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

आगरी कोळी बांधव सर्व सणांप्रमाणे होळी हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. अशी माहिती दिवा कोळीवाडा येथील नाट्यकर्मी यशवंत दिवेकर यांनी दिली. कोळी भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे हावलूबायचा सण आणि रंगपंचमी म्हणजे शिमगा म्हणून ओळखला जातो.जावईबापूंचा सन्मानकोपरखैरणे गावात एक गाव एक होळी ही या गावची अनेक वर्षांची होळीची परंपरा आहे. या सणाला गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्ने झाली असतील त्या नव दाम्पत्याला मान देत जावई बापूंचा जाहीर सत्कार केला जातो. होळी पेटविल्यानंतर सर्वप्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालते आणि मग गावकरी कुटुंबासह होळीला नारळ आणि ऊस वाहतात. होळीच्या राखेचा टिळा लावल्यानंतर सर्व जण घरचा रस्ता पकडतात, अशी माहिती कोपरखैरणे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सुतार यांनी दिली.होळी आणि शिमग्याचा लग्नसोहळादिवा कोळीवाडा येथे शिमग्याच्या सणाची सोंगे काढण्याची लगबग सुरू झाली आहे. घणसोली गावात महिलांनी ‘दवणा नाय गो दवण्याची कारी...’ या होळी नृत्याची तयारी केली आहे. तर ऐरोली कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी होळी आणि शिमग्याच्या लग्नाची तयारी केली असून लग्नपत्रिकाही घरोघरी वाटप केल्या आहेत. रविवारी ८ मार्च रोजी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास एकवीरा चौक, ऐरोली कोळीवाडा येथे होळी आणि शिमग्याचा लग्नसोहळा पार पडला.होड्यांची, बोटींची पूजादिवाळीप्रमाणेच होळी हा दुसरा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत कोळीबांधव आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या होड्यांची पूजा करतो. तिची रंगरंगोटी करून तिला नववधूप्रमाणे सजवले जाते. सायंकाळी कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या ठेक्यावर होळीभोवती नाचतात. हा सण नवविवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाचा असतो, अशी माहिती दिवाळे कोळीवाडा येथील हेमंत कोळी यांनी दिली.

टॅग्स :Holiहोळी