भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी

By नामदेव मोरे | Updated: July 19, 2024 19:02 IST2024-07-19T19:01:59+5:302024-07-19T19:02:29+5:30

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे.

Vegetable prices start falling; Peas, drumstick The prices of leafy vegetables including cowthimber also reduced | भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी

भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात; फरसबी, शेवगा, वाटाणा नियंत्रणात; कौथिंबरसह पालेभाज्यांचे दरही झाले कमी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे वाढलेले भाजीपाल्याचे दर कमी होऊ लागले आहेत. वाढलेली आवक व ग्रहाकांनी खरेदीकडे फिरवलेली पाठ यामुळे दर कमी झाले आहेत. फरसबी, शेवगा, वाटाणासासह पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरही कमी होऊ लागले आहेत.

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६२८ ट्रक, टेम्पोमधून २९१४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख ३९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सातारा, पुणे, सांगली, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून व दक्षीणेकडील राज्यांमधूनही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे व बाजारभाव वाढलेले असल्यामुळे ग्राहकांनी भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली आहे. ग्राहक कमी असताना आवक अचानक वाढल्यामुळे बाजार समितीमध्ये भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. एक आठवड्यापुर्वी ८० ते९० रुपये किलो दराने विकला जाणारा मुळा आता ३० ते ४० रुपयांवर आला आहे. वाटाण्याचे दर १६० ते २०० वरून ७० ते ९० रूपयांवर आले आहेत. फरसबीचे दर ८० ते ९० वरुन ५० ते ५६ रुपयांवर आले आहेत. शेवगा शेंग, दोडका, मिर्ची, कारली, फ्लॉवर यांचे दरही कमी झाले आहेत.

           कोथिंबीर, शेपू, कडीपत्ता, मेथीचे दरही कमी झाले आहेत. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये टाकून दिलेल्या भाजीपाल्याचे ढिग पहावयास मिळत आहेत. किरकोळ मार्केटमध्ये विक्रीसाठी नेलेल्या मालामध्येही खराब मालाचे प्रमाण वाढत आहे.

टोमॅटोची तेजी कायम
भाजीपाल्याचे दर कमी होण्यास सुरूवात झाली असताना टोमॅटोच्या दरामध्ये मात्र प्रचंड वाढ होत आहे. एक आठड्यापुर्वी बाजार समितीमध्ये २० ते ४२ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमटो आता ६० ते ७० रुपयांवर पोहचला असून किरकोळ मार्केटमध्ये १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दर
वस्तू - १२ जुलै - १९ जुलै
भेंडी - ३२ ते ५० - १६ ते २६
फरसबी - ८० ते ९० - ५० ते ५६
फ्लॉवर २० ते २६ - १६ ते २२
काकडी २० ते ३६ - १४ ते २२
कारले - ४० ते ४६ - २५ ते ३५
ढोबळी मिर्ची ३५ ते ४५ - १५ ते २५
शेवगा शेंग - ७० ते ९० - ६० ते ८०
दोडका ३० ते ३६ - १५ ते २५
टोमॅटो - २० ते ४२ - ६० ते ७०
वाटाणा - १६० ते २०० - ७० ते ९०
मिर्ची ६० ते ८० - २५ ते ६०
मुळा ८० ते ९० - ३० ते ४०

पालेभाज्यांचे प्रतीजुडी दर
वस्तू - १२ जुलै - १९ जुलै
कडीपत्ता - ३० ते ४० - २५ ते ३५
कोथिंबीर - २० ते २२ - ८ ते १२
मेथी १८ ते २० - १० ते १२
पालक १० ते १५ - १० ते १५
शेपू १५ ते २० - १० ते १२
 

Web Title: Vegetable prices start falling; Peas, drumstick The prices of leafy vegetables including cowthimber also reduced

टॅग्स :Marketबाजार