पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

By वैभव गायकर | Published: November 7, 2023 06:19 PM2023-11-07T18:19:54+5:302023-11-07T18:20:51+5:30

Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे.

Vande Bharat Walk, 16000 km walk by youth for environment protection and education | पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

- वैभव गायकर
पनवेल - उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. 21 राज्यातुन जाणारी हि पदयात्रा 4 डिसेंबर रोजी युपीच्या हनुमान गढी येथुन सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश,बिहार, झारखण्ड, छत्तीसगढ़, उड़ीसा, अन्द्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडु, केरला, कर्नाटका, गोवा आदी राज्यातुन 9400 किमी  पायी प्रवास केल्यांनतर आशुतोष पांडे महाराष्ट्रात दाखल झाला आहे.दि.7 रोजी आशुतोष नवी मुंबईत दाखल झाला.या प्रवासा दरम्यान सेव्ह द इन्व्हरमेन्ट हे जनजागृतीपर फलक सोबत घेऊन पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश आशुतोषने दिला आहे.या प्रवासादरम्यान आजवर 50 हजार विद्यार्थ्यांनामध्ये जवळपास 2300 झाडांचे वृक्षारोपण केले आहे.या प्रवासादरम्यान आशुतोषने विविध राज्यातील जिल्हाधिकारी,राज्यपाल,मुख्यमंत्री,मेट्रोमहोदय,सामाजिक संघटना आदींसह हजारो नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत.हि पदयात्रा पुढे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कश्मीर, लद्दाख,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नतंर  2025 मे मध्ये अयोध्येत पूर्णत्वास येणार असुन यावेळेला एक लाख वृक्षा रोपणाचा संकल्प पूर्ण झालेला असेल अशी माहिती आशुतोष पांडे यांनी दिली.

या प्रवासादरम्यान मला भारतीय संस्कृतीचे विविध अंग जवळून पहावयास मिळत आहेत.रस्त्यातून जाताना नागरिक देखील कुतूहलाने विचारपूस करत असल्याचे आशुतोष ने सांगितले.

कोविडमुळे माझ्या जवळच्या मित्रांना मला गमवावे लागले.त्यावेळेला निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा हा भयानक होता.यावेळी मी पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक झालो आणि नागरिकांना याचे महत्व सांगु लागलो.पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाल्यास भारताची प्रगती अधिक वेगाने होईल.
- आशुतोष पांडे (16000 किमी पदयात्री )

Web Title: Vande Bharat Walk, 16000 km walk by youth for environment protection and education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.