माथेरान नगराध्यक्षपदी वंदना शिंदे बिनविरोध

By Admin | Updated: June 24, 2016 03:48 IST2016-06-24T03:48:46+5:302016-06-24T03:48:46+5:30

माथेरान गिरिस्थान नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना शैलेश शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून विनीता गुप्ता यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली

Vandana Shinde uncontested as president of Matheran City | माथेरान नगराध्यक्षपदी वंदना शिंदे बिनविरोध

माथेरान नगराध्यक्षपदी वंदना शिंदे बिनविरोध

माथेरान : माथेरान गिरिस्थान नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना शैलेश शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून विनीता गुप्ता यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. गौतम गायकवाड यांनी नगराध्यक्षपदाचा तसेच सुनीता पेमारे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने त्या दोन्ही रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
माथेरानचे महसूल अधीक्षक संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माथेरान गिरिस्थान नगरपालिकेच्या अनुसूचित जाती राखीव असलेल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. दुपारी पालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत वंदना शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर रिक्त उपनगराध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनीता गुप्ता यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे विनीता गुप्ता यांची निवड झाल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)

Web Title: Vandana Shinde uncontested as president of Matheran City