वाशीतील मैदानाचा होणार कायापालट

By Admin | Updated: July 9, 2017 02:11 IST2017-07-09T02:11:31+5:302017-07-09T02:11:31+5:30

वाशी, सेक्टर-१ येथील सुभाषचंद्र बोस मैदानाची दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी या मैदानाचा कायापालट करण्याचा निर्णय

Vaishali playground will be transformed | वाशीतील मैदानाचा होणार कायापालट

वाशीतील मैदानाचा होणार कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी, सेक्टर-१ येथील सुभाषचंद्र बोस मैदानाची दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी या मैदानाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानाची डागडुजी करतानाच मैदानाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, संपूर्ण प्रभागात जवळपास ११ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय दिव्या गायकवाड यांनी घेतला आहे. त्याचा शुभारंभही करण्यात आला आहे.
वाशीतील मुलांना खेळण्यासाठी मैदानांची कमतरता आहे. मैदाने आहेत; परंतु ते विविध शाळांशी संलग्न असल्याने अनेकदा त्यांना कुलुप असते. वाशी, सेक्टर-१मध्ये सुभाषचंद्र बोस हे एकमेव मैदान आहे. त्यामुळे या मैदानावर खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या मोठी असते. मात्र, नियमित डागडुजीअभावी या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मैदानाच्या चारी बाजूला पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी असलेल्या उघड्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. तसेच येथे खेळताना गटारांत पडून दुखापत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी या मैदानाची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली होती. त्या संबंधीच्या कामाचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरीही मिळविली आहे. आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. मैदानाचे सपाटीकरण करून त्यावर लाल मातीचा भराव टाकला जाणार आहे. तसेच मैदानाच्या चारी बाजूला असलेल्या उघड्या गटारांवर झाकणे बसविली जाणार आहेत. मोडकळीस आलेल्या मैदानाचे सरंक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. या कामांसाठी १७ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तत्पूर्वी मैदानाच्या चारी बाजूंकडील मोकळ्या जागेवर हिरवळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शुक्रवारी नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या हस्ते येथे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नवी मुंबई इलेवन संघाचे महादेव डुंबरे, अजित कांडर, दत्ता पोळ, गिरीश चावरे, अर्जुन पाटील, नितीन सोनावणे, सुशांत पटनाईक, विनायक भोर आदींनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

Web Title: Vaishali playground will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.